महाराष्ट्रात एकीकडे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका आज रद्द करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. मात्र भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. त्याउलट एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपद या दोन्हीही पदांवर ठाम आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत मोठा तिढा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे.