शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्ण कलाटणी मिळाली. दोन्ही पक्षांमधील एक-एक गट सत्तेत सहभागी असून दुसरा गट विरोधी पक्षात आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने एक मोठं भाकित केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही भाजपच्याच तिकिटावर लढतील, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट-सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
आमदार रोहित पवार हे शुक्रवारी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही, तर एक राजकीय भाकित देखील केलं. एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघेही भाजपच्याच तिकीटावर लढतील, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला.