Thursday, July 25, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने केला ‘हा’ मोठा बदल

शिंदे फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विमा योजनेत सरकारने मोठा बदल केला आहे.

याआधी गट अ, ब, क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना सरसकट मिळणाऱ्या १० लाख रुपयांच्या विमा रक्कमेत सरकारने मोठी वाढ केली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख रुपये तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख रुपये मिळतील. गट क व ड कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपये मिळणार आहेत.अपघातात अंपगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास ही मदत दिली जाणार आहे. विम्यापोटी आकारण्यात येणाऱ्या वार्षिक वर्गणीतही वाढ केली जाणार आहे.
सरसकट ३०० रुपयांऐवजी आता कर्मचारी वर्ग निहाय वर्गणी आकारणी केली जाणार आहे. गट ‘अ’ साठी ८८५, गट ‘ब’ साठी ७०८ रुपये वर्गणी आणि गट ‘क’ व ‘ड’ साठी ५३१ रुपये वर्गणी आकारली जाईल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles