Saturday, May 18, 2024

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस

बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शॅडो रजिस्ट्रर खर्चात तफावत आढळून आल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.
दोन्ही उमेदवारांनी ४८ तासांच्या आत निवडणूक खर्चाचा खुलासा करावा, अशी सूचना देखील या नोटीसीत करण्यात आली आहे. उमेदवारांनी नोटीसीला उत्तर न दिल्यास खर्चातील तफावत दोन्ही उमेदवारांना मान्य आहे असं समजलं जाणार, असंही या नोटीसीत मांडण्यात आलं आहे.

नोटीसीवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे, असंही नोटीसीत म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे.

दोन्ही उमेदवारांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू असून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी झाली. त्यात सर्व ३८ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles