अहमदनगर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी खोसे यांना निवडीचे पत्र पाठवले व महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती सुधारणा अधिनियम ३०/२००० मधील कलम ३ चा पोट कलम (३) मधील जिल्ह्यातील ६ जणांची निवडी करण्यात आली. राज्य सरकारचे उपसचिव नि.भा.खेडकर यांच्या सहीने जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांच्या निवडीबद्दल माजी.आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अभिजीत खोसे यांच्या वतीने शहरातील विकास कामांना मंजुरी मिळण्यासाठी व शहरात विकास कामांना निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न मांडून निधी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे..