अहिल्यानगर भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक आहेत.ना. राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार निवडून आले असून, त्यात विखेंचे मोठे योगदान आहे.मात्र, आ. राम शिंदे यांचा पराभव झाला.मात्र, जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील भाजपचे नेते त्यांचा कार्यकर्ता पुढे करणार आहे.आ. शिवाजी कर्डिले यांनी जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांना संधी दिली होती.त्यामुळे ना. राधाकृष्ण विखे,आ. शिवाजी कर्डिले, आ. राम शिंदे यांच्या गटातटात जिल्हाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार? जिल्हाध्यक्ष निवडताना भाजपातील गटतटाचे राजकारण चांगलेच पेटणार आहे.भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये होणार आहे. संघटनेची निवडणूक निःपक्ष आणि पारदर्शक व्हावी, यासाठी पक्षाने निरीक्षकांच्या नियुक्त केल्या आहेत.महाराष्ट्रासाठी निरीक्षक म्हणून अरुण सिंग यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.भाजपची अंतर्गत रचना मजबूत आणि पारदर्शक राहावी, यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे निःपक्ष पद्धतीने होण्यासाठी निरीक्षकांसह त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील गावागावांत बुध अध्यक्ष प्रथम नियुक्त करण्यात येणार आहे.त्यानंतर तालुकाध्यक्ष म्हणजे मंडल अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.बुथ अध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांची निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे.
जिल्हाध्यक्षाची निवड झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर भाजपा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार, अशी भाजपाची अंतर्गत निवडणूक प्रक्रिया आहे.विखे, शिंदे, कर्डिले, कोणाला संधी देणार !विधानसभा निवडणुकीत ज्यांनी मनापासून पक्षाचे काम केले त्या कार्यकर्त्याला अध्यक्षाची संधी मिळू शकते. गावातील बुथ अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदासाठी विखे, शिंदे आणि कर्डिले हे जो कार्यकर्ता आपले ऐकतो, जे सांगेल तसे वागतो, राजकारण करतो तोच कार्यकर्ता जिल्हाध्यक्षपदावर विराजमान होऊ शकतो. विखे, शिंदे आणि कर्डिले गटतटाचे राजकारण या निवडणुकांमुळे चांगलेच रंगणार आहे.दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी ‘हे’ चर्चेत !बाळासाहेब महाडिक (श्रीगोंदा), अॅड. युवराज पोटे (नगर तालुका), मृत्यूंजय गर्ने (पाथर्डी), अशोक खेडकर (कर्जत), संतोष म्हस्के (नगर तालुका),दीपक कार्ले (नगर तालुका), अरुण मुंडे (शेवगाव), विद्यमान अध्यक्ष दिलीप भालसिंग (नगर तालुका), मनोज कोकाटे (नगर तालुका)उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी ‘हे’ चर्चेतप्रकाश चित्ते (श्रीरामपूर), जालींदर वाघचौरे (अकोले), शिर्डीचे राजेंद्र गोंदकर (शिर्डी), श्रीराज डेरे (संगमनेर), नितिन कापसे (राहाता)शहर जिल्हाध्यक्षपदासाठी ‘हे’ चर्चेत !सचिन पारखी, अॅड. धनंजय जाधव, सुवेंद्र गांधी, बाबा सानप, महेश तलवे, भैय्या गंधे, बाबासाहेब वाकळे, मिलिंद गंधे, निखिल वारे, प्रवीण ढोणे, रवींद्र बारस्कर, गोपाल वर्मा, दामोदर बठेजा, रामदास आंधळे तसेच विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर.
नगर जिल्ह्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षांची डिसेंबरमध्ये निवड, निरीक्षकांची नियुक्ती ‘या’ नावाची चर्चा
- Advertisement -