Wednesday, February 12, 2025

अहमदनगर माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष तालुकाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानदेव बनकर तर श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी राजाराम बनकर यांची नियुक्ती करण्यात आली. माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरूण तिखे, प्रदेश उपाध्यक्ष राम पानमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष गणेश बनकर यांनी नुतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.
दोन्ही पदाधिकारी श्रीगोंदा तालुक्यातील असून, त्यांचे उत्तमपणे सामाजिक कार्य सुरु आहे. समाजाचे विविध प्रश्‍न सोडवून, सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य ते करत आहे. ज्ञानदेव बनकर यांचे समाजात असलेले उत्तम संघटन व माजी उपसरपंच राहिलेले राजाराम बनकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा माळी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष नितीन डागवाले, योगेश बनकर, प्रकाश इवळे, विष्णु होले आदी माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश बनकर यांनी माळी महासंघाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर उत्तमपणे संघटन सुरु आहे. ओबीसी आरक्षणावरुन समाजात जागृतीचे कार्य हाती घेण्यात आले आहे. तर समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles