नगर -राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा 31 डिसेंबरपर्यंत पुढ ढकलण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यात सध्या 450 ते 500 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. यातील क आणि ड वर्गातील निवडणुका गेल्या सात ते आठ महिन्यांपासून रखडलेल्या आहेत. प्रारूप मतदार यादी कार्यक्रमापर्यंत प्रक्रिया झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीमुळे जानेवारी, फेबु्रवारीपासून या निवडणूक जागेवर थांबवण्यात आल्या होत्या.
मात्र, मागील आठवड्यात सहकार निवडणूक प्राधिकारणाकडून निवडणुकीसाठी हिरवा कंदील होणार असल्याने या येत दाखवण्यात 1 ऑक्टोबर निवडणूक प्रक्रिया राबवण्यास सांगण्यात आले. मात्र, आता सहकार विभागाच्या सर्व निवडणूका आता पुढील वर्षी 2025 होणार असून 31 डिसेंबरपर्यंत सर्व निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात राज्यात अ वर्गाच्या 42, ब वर्गाच्या 1 हजार 716, क वर्गाच्या 12 हजार 250 आणि ड वर्गाच्या 15 हजार 435 संस्थांच्या निवडणुका होणे बाकी आहे.