Wednesday, April 17, 2024

राज्यातील सुमारे ३८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय…

राज्यातील सुमारे ३८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मे २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या. प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असल्याने राज्य सरकारचा निर्णय.
राज्यामध्ये सद्यःस्थितीत टप्पा ०१ ते ०६ व ई १ २०२३ नुसार दिनांक ३१.१२.२०२३ अखेर निवडणूकीस पात्र असलेल्या ९३,३४२ सहकारी संस्थांपैकी ५०,२३८ सहकारी संस्थांची निवडणूक पुर्ण झालेली असून १०,७८३ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया चालू असणे, तसेच २०, १३० सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया अद्याप प्रलंबित असणे, आणि सन २०२४ मध्ये एकूण ७,८२७ सहकारी संस्था निवडणूकीस पात्र असणे,ज्याअर्थी, सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेच्या निवडणूक पुर्वतयारी कामकाजासाठी सहकार विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा संबंधित जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहित केलेल्या असणे, तसेच सहकार विभागाकडील तालुका, जिल्हा व प्रादेशिक स्तरावर मोठ्या प्रमाणात अधिकारी / कर्मचारी यांची पदे रिक्त असणे, त्याअर्थी, निवडणूकीस पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३कक मध्ये निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य शासनास असलेल्या अधिकारानुसार, नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झालेल्या, तसेच ज्याप्रकरणी मा. सर्वोच्च / मा.उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून दिनांक ३१ मे, २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. शासन आदेश क्रमांकः सनिनि-१५२४/प्र.क्र.२९/१३स,सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles