कंत्राटी पद्धतीने लिपीक-टंकलेखक पदासाठी
पात्र माजी सैनिकांनी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
अहमदनगर :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,अहमदनगर येथे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या विविध प्रकारच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात व एकत्रित मानधनावर लिपीक-टंकलेखक पदाची भरती करण्यात येणार आहे. पात्र माजी सैनिकांनी 25 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अर्जासोबत मराठी टंकलेखन 30 शब्द व इंग्रजी प्रतीमिनिट 40 शब्द टंकलेखनाचे प्रमाणपत्र, सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी कळविण्यात येणार असुन याबाबत अधिक माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.