नगर, – “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्ये २७२६ आणि उद्योग क्षेत्रामध्ये ११४१ रिक्त पदे उपलब्ध आहेत. उद्योजकांनी आणि उमेदवारांनी https://rojgarmahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त नि. ना. सुर्यवंशी यांनी केले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्या कारणाने युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामांचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीसाठी विद्यावेतन देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२४१-२९९५७३५ किंवा योजना समन्वयक वसीमखान पठाण (९४०९५५५४६५) मच्छिंद्र उकिरडे (मो. नं. ९५९५७२२४२४) संतोष वाघ (मो. नं. ८८३०२१३९७६) बद्रिनाथ आव्हाड (मो.नं.९४२०७२५२८०), योगेश झांजे (मो. नं. ९५८८४०८८९०) यांच्याशी संपर्क साधावा.
इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून रोजगाराच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहनही श्री.सुर्यवंशी यांनी केले आहे.