Friday, February 23, 2024

दुसरे लग्न केल्यानंतरही शिक्षिका घेतेय घटस्फोटितेचे फायदे, नगर जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार

जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार : नगर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू
अहमदनगर : नगर तालुक्यातील एक शिक्षिका विवाहित असतानाही ती प्रशासनाला खोटी कागदपत्रे देऊन घटस्फोटितेचे फायदे घेत आहे, अशी तक्रार जिल्हा परिषदेकडे झाली आहे. या महिलेने आपल्या पतीसोबतच दुसरा विवाह केला आहे व त्यांना एक मुलगाही आहे, असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.

सदर शिक्षिकेने घटस्फोटिता असल्याचे कारण देत सोलापूर जिल्ह्यातून अहमदनगर जिल्हा परिषदेत बदली घेत या संवर्गाचे फायदे घेतले. तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे की, आपले पती पारनेर तालुक्यात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. माझे पती मला नांदवत नाहीत. त्यांनी माझा छळ केला. याबाबत आमचे कायदेशीर भांडण सुरू आहे. माझा पोटगीचाही दावा आहे. दरम्यान, आपल्या पतीने या शिक्षिकेसोबत लग्न केले. या शिक्षिकेने २०१५ साली आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतलेला आहे. नंतर तिने हे दुसरे लग्न केले. दुसऱ्या पतीपासून या शिक्षिकेला एक मुलगाही झाला आहे. असे असतानाही या शिक्षिकेने आपण घटस्फोटिता असल्याचे दाखवून सोलापूर व अहमदनगर जिल्हा परिषदेला फसविले आहे. आपण यासंदर्भात जिल्हा परिषद व विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तसेच सदर प्राध्यापकाबाबतही अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेकडे तक्रार केली आहे. मात्र, प्रशासनाने काय कार्यवाही केली हे समजू शकले नाही. आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचीही भेट घेतली आहे. त्यांनी माझी तक्रार समजून घेतली आहे. यासंदर्भात आपणाकडे सर्व पुरावे असून प्रशासनाने मागणी केल्यानंतर आपण सर्व पुरावे सादर करू, असे या तक्रारदार महिलेने सांगितले.
सदरील वृत्त लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे

शिक्षिका विवाहित असतानाही ती घटस्फोटितेचे फायदे घेत असल्याची लेखी तक्रार जिल्हा परिषदेकडून आम्हाला प्राप्त झाली आहे. सदर महिला कागदोपत्री घटस्फोटिता दिसते हे खरे आहे. त्या सोलापूर जिल्ह्यातून अहमदनगरला आल्या आहेत. यासंदर्भात विस्तार अधिकारी चौकशी करीत आहेत. चौकशीनंतर कारवाई केली जाईल.
– बाबूराव जाधव, गटशिक्षणाधिकारी, अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles