Wednesday, February 28, 2024

उन्हाळ्यापूर्वीच नगर तालुक्यात विहिरी कोरड्याठाक; हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण

नगर तालुक्यातील गुंडेगाव राळेगण परिसरात या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे गुंडेगाव सह वाडी वस्तींवर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.तसेच विकतच्या पाण्यावर नागरिकांची मदार आहे.तर गावातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना प्राण्यांची व्यथा कोण समजून घेणार? असा देखील प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्जन्यमान खुपच कमी राहिले. पावसाळ्यात मोठा पाऊस न पडल्याने जलसाठे कोरडेच राहिले. परिणामी जमीनीतील पाणी पातळीत कुठलीच वाढ झालेली नाही. विहीर, बोअरवेल कोरडेठाक असल्याने भर पावसाळ्यात देखील अनेक भागात अत्यल्प पावसामुळे यावर्षीं गावातील साठवण तलावाचे ३० टक्क्यांपेक्षाही कमी पाणी साठा झाला होता.सध्या गुंडेगाव तलावात शुन्य टक्के पाणी साठा झाला असून तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील विहीर, बोअर कोरडेठाक पडल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.यामुळे शेती उत्पादनात मोठी हानी झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पाण्याचा पण प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे याबाबत वेळेत उपाययोजना व्हाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.

यावर्षी दुष्काळामुळे पाणी टंचाई खुप आहे. नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तरी पाणीटंचाईमुळे टँकर सुरु करण्याचे प्रस्ताव पंचायत कार्यालयात सादर करण्याचे काम चालू आहे.याबात भूजल कार्यलय, पंचायत समिती कार्यालयाचे दाखले मिळाले की टॅंकर तात्काळ सुरु करून ज्या ठिकाणी पाणी अडचण आहे त्या ठिकाणी तात्काळ पाणी व्यवस्था सुरु होईल…

अशोक जगदाळे,ग्रामसेवक,गुंडेगाव.

पाणी हा आपल्या जीवनातील अमुल्य घटक, ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी पूर्वी वणवण करावी लागत असल्याने प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात जेणेकरून उन्हाळ्यात पाणी संकट टळले जाईल..

श्रीकांत आगळे, नागरिक गुंडेगाव.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles