देशभरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी केले एकनाथ ढाकणे यांच्या पुढाकाराचे कौतुक
नगर : नवी दिल्ली येथील रामलिला मैदानावर देशभरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी महामोर्चा आंदोलन केले. यात महाराष्ट्रातील ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक सहभागी झाले होते. या महामोर्चासाठी देशभरातून कर्मचारी आले असल्याने मैदानावर प्लास्टिकच्या बाटल्या, कागदे, प्लास्टिकच्या पिशव्या असा कचरा जमा झाला होता. एकनाथ ढाकणे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी सर्व सहकारी ग्रामसेवकांसह मैदानात स्वच्छता मोहिम राबविली. सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा विसर आंदोलनावेळीही पडला नसल्याचे नगर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या या पुढाकाराचे देशभरातील कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
अखिल भारतीय राज्य सरकारी केंद्रीय कर्मचारी महासंघ नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा आणि राज्य महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, कार्याध्यक्ष प्रशांत जामोदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या महामोर्चावेळी एकनाथ ढाकणे यांच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पदाधिकाऱ्यांनी कचरा संकलन करण्याचा मनोदय व्यक्त करून प्रतिनिधीक स्वरूपात कचरा संकलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गावपातळीवर स्वच्छता अभियान अंमलबजावणी करण्याचं काम ग्रामसेवक स्वच्छता दूत म्हणून गावोगावी देशभर आणि महाराष्ट्र राज्यभर करत आहेत. त्याच धर्तीवर रामलीला मैदान येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात अहमदनगर जिल्ह्यातील महामोर्चाचे नेतृत्व करणारे एकनाथ ढाकणे, सुनील नागरे, युवराज पाटील, मंगेश पुंड, रवींद्र ताजने, अशोक नरसाळे, महेश जंगम वलिवा मुंडे, भैय्या कोठुळे, सुभाष गर्जे , आसाराम कपिले, रुबाब पटेल, संदीप बडाख, संपत दातिर, देविदास राऊत, श्याम भोसले, सचिन गदादे, रामदास गोरे, तानाजी पानसरे, संदीप लगड, शिवाजी पालवे, आबा ड मरे, गोवर्धन रांधवणे, लालाभाई मनियार, राजेश जगताप, सोमनाथ गभाले, संपत मधे, अशोक खळेकर, अनिल बोरवे, बापूसाहेब चेडे, जालिंदर कोठुळे, प्रदीप कल्याणकर, नफीस खान पठाण, एम.पी.शेख, देविदास राऊत, राहुल घोडके, सागर शिनगारे, नितीन गिरी, लक्ष्मण नांगरे ,बबनराव सांगळे, संभाजी दौंड, कृष्णा बडे, अर्जुन गाडगे, गणेश पाखरे, सचिन कलापुरे, सखाहारी थोरात, रवींद्र लांबे सुधाकर वळवी फुल्ला तडवी प्रवीण गावित सोनावणे डी जी आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.