अहमदनगर: राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पार पडल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जवळपास दररोज काही ना काही समस्या समोर आणल्या जात आहेत. यामध्ये ईव्हीएम यंत्रांच्या सुरक्षेविषयी विरोधकांकडून वारंवार सवाल उपस्थित केले जात आहेत. यामध्ये आता शरद पवार गटाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके यांची भर पडली आहे. निलेश लंके यांनी एक व्हीडिओ ट्विट करत नगरच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
निलेश लंके यांनी ट्विट करताना म्हटले आहे की
अहमदनगरच्या स्ट्राँग रुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न! निलेश लंकेंकडून व्हीडिओ ट्विट
- Advertisement -