Tuesday, March 18, 2025

मविआनंतर आता भाजपच्या उमेदवाराची EVM वर शंका,फेरतपासणीसाठी भरले 8 लाख रुपये

विधानसभा निवडणुकीत मविआतील अनेक पराभूत उमेदवारांनी EVM फेरतपासणीची मागणी केली असताना आता भाजपच्या उमेदवारानेही EVM वर शंका उपस्थित केली आहे. कर्जत- जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 17 बूथवरील ईव्हीएमची फेरतपासणीची मागणी केली आहे. यासाठी राम शिंदे यांनी 8 लाख 2 हजार 400 रुपयांचे शुल्क शासनानकडे भरले आहे.

कर्जत जामखेडमधील विधानसभा निवडणूक अटीतटीची झाल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी ही निवडणूक अवघ्या 1243 मतांनी जिंकली. हा पराभव मात्र राम शिंदेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळेच त्यांनी कर्जत-जामखेडमधील 17 बूथवरील ईव्हीएमच्या फेरतपासणीची मागणी केली. त्यासाठी त्यांनी 8,02,400 रुपयेही भरले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles