Saturday, March 2, 2024

काल संध्याकाळपर्यंत अशोक चव्हाण पक्ष नेत्यांबरोबर लोकसभा निवडणुकीची चर्चा करत होते…आज अचानक…

काँग्रेसचे राज्यातील वरीष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच, अशोक चव्हाण यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

अशोक चव्हाणांनी भूमिका मांडल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना रविवारी अशोक चव्हाण पक्षाच्या बैठकीत सक्रीयपणे उपस्थित होते, असं ते म्हणाले. “अजून तरी अशोक चव्हाण यांनी पुढची काही भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते जन्मापासून काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेससाठी खूप काही केलं हे ते सांगत होते. काँग्रेस आत्ताही त्यांना मोठी संधी देत होती. कालच आमच्या महाराष्ट्र प्रभारींसमवेत ज्येष्ठ नेते, अशोक चव्हाण यांची रणनीतीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. संध्याकाळी ४-५ वाजेपर्यंत ते आमच्यासोबत होते. त्यांच्या डोक्यात असं काही असेल असं वाटलं नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles