Wednesday, November 29, 2023

मराठा आरक्षण विरोधी याचिकेसाठीचा संपूर्ण खर्च देवेंद्र फडणवीस यांच्या संस्थेकडून…

मराठा आरक्षण प्रश्नावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे म्हणाले, “विधीज्ञ उके यांनी त्यांच्या पुस्तकात मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर एक मोठा लेख लिहिला होता. या लेखात स्पष्टपणे म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयात लागणारे वकील आणि सर्व खर्च हा देवेद्र फडणवीस ज्या संस्थेत आहेत त्या संस्थेच्या वतीने करण्यात आला.” सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत अनिल गोटे बोलत होते.

गोटे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी चुकीचं केलं असं मी म्हणणार नाही. कारण, महाराष्ट्रात जातीवर नव्हे तर गुणावर आरक्षण मिळालं पाहिजे ही बाब मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवली जाते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: