शेवगाव तालुक्यातील मुरमी व लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेषराव वंजारी (वय ५५, रा. मुरमी) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवत ऊसतोड कामगाराच्या मुकादमासह दोन आरोपींना १२ तासांत करमाळा येथून जेरबंद केलंय. नितीन जगन्नाथ तकिक (रा. बांगी नंबर २, ता. करमाळा, जि. सोलापूर) व नितीन बबन भोसले (रा. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी आरोपींचे नावे आहेत.
शेषराव वंजारी व त्यांच्या पत्नी आशाबाई हे नगरहून गावी मुरमीकडे दुचाकीवर येत होते. बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चौकात फळे घेण्यासाठी ते थांबले होते. त्यावेळी अचानक पांढऱ्या कारमधून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुकादम नितीन तकिक व त्याच्या साथीदारांनी शेषराव वंजारी यांना कारमध्ये घालून पळवून ने नेले. या घटनेनंतर त्यांच्या पत्नी आशाबाई वंजारी यांनी घाबरून पोलिसांत धाव घेतली.पोलिसांचा समांतर तपास व १२ तासात आरोपी जेरबंदपत्नीच्या फिर्यादीवरून घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिसांनी भरभर तपासाची सूत्रे हलवली. घटनेचा समांतर तपास सुरु केला. याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी करमाळा येथे आहेत. यानुसार पोलिस निरीक्षक विलास पुजारी व त्यांच्या टीमने करमाळा येथे जात नितीन तकिक व नितीन भोसले याला ताब्यात घेतले. शेषराव वंजारी यांची सुटका केली. माझ्या मुलाला ऊसतोडीसाठी पैसे दिल्याचे खोटे सांगून मला कारमध्ये घालून आरोपी घेऊन गेले. मात्र, आमच्याकडे कसल्याही प्रकारची ऊसतोड मुकादमाची उचल नाही. कारमधून नेताना, धामोरी गावाजवळ मनसुबे ढाब्याजवळ आरोपींनी मला पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यामुळे मी फार घाबरलो होतो असे शेषराव यावेळी म्हणाले.
माजी सरपंचाचे ऊसतोड मुकादमाकडून अपहरण,नगर जिल्ह्यातील घटना…
- Advertisement -