Tuesday, May 13, 2025

Exit poll…बीड मध्ये जरांगे नाही ‘मुंडे’ फॅक्टरच चालणार…

Tv9 पोलस्ट्राट आणि पीपल इनसाईट्सच्या एक्झिट पोलनुसार बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी आघाडी घेतली आहे. तर, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे हे पिछाडीवर आहेत.
राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशी असल्याचे पाहण्यात मिळाले होते. यंदा महायुतीत अजित पवार गट सोबत असल्याने पंकजा मुंडेंचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे सोबत असल्याने यंदा पंकजांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली होती. पंकजांसाठी महायुतील अजितदादांसह अनेक दिग्गज नेते प्रचारसभेसाठी आले होते. एवढेच नव्हे तर, स्वतः पंतप्रधान मोदीही पंकजांना विजयी करा हे सांगण्यासाठी बीडमध्ये आले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles