अहमदनगर-महापालिकेची गुरूवारी सकाळी महापालिका आयुक्तांनी २७ डिसेंबरलाच मुदत संपुष्टात आल्यासंदर्भात पत्र काढले आहे. तसेच मुदत संपल्यामुळे पुढील काळात कोणत्याही प्रकारची सभा, बैठक घेता येणार नाही, असेही निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेची मुदत २७ संपत असल्याचे व त्यानुसार प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात सरकारला पत्र दिले होते. त्या अनुषंगाने आयुक्तांनी हे पत्र काढले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह प्रमुख अधिकार्यांना या पत्राच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या लोकप्रतिनिधींची मुदत २७ डिसेंबर २०२३ रोजीच संपली. राज्य निवडणूक आयोगाने केले स्पष्ट. त्यामुळे आजपासून महापालिकेचा कारभार प्रशासकामार्फत चालणार. सुप्रिम कोर्टात ओबीसी आरक्षणासंबंधीची याचिका प्रलंबित असल्याने निवडणूक केव्हा होणार? हे निश्चित नाही.