वाहन पसंतीक्रमांक शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी सुविधा उपलब्ध
अहिल्यानगर, दि.५-नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारकांना पसंतीक्रमांक शुल्क आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असुन या सुविधेचा लाभ वाहनधारकांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारक परिवहन कार्यालयात येऊन पसंती क्रमांक शुल्क भरणा करून त्यांच्या वाहनांकरिता पसंती क्रमांक घेत असतात. २६ नोव्हेंबर २०२४ पासून शासनाने fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर पसंती क्रमांक शुल्क ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच वैयक्तिक मालकीच्या वाहनाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहन मालकास आकर्षक नोंदणी क्रमांक परिवहन कार्यालयामार्फत जारी करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
वाहन पसंतीक्रमांक शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी सुविधा उपलब्ध
Comments are closed.
- Advertisement -
Need expected 4 wheeler number satara rto office mh11 DN 7171