Saturday, December 9, 2023

हिंगणघाट तरूणीचे जळीतकांड, योग्य न्यायाचा शब्द फडणवीस यांनी केला पूर्ण

वर्धा – हिंगणघाट येथील तरूणीच जळीत हत्याकांड प्रकरण महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या जळीतकांडाचा महाविकास आघाडीलाच पडला होता विसर अखेर महायुतीच्या सरकारकडून पिडीत कुटुंबियांच दुख सावरण्याचा प्रयत्न
अडीच वर्ष सत्तेत असनार ठाकरे सरकारची फक्त घोषणाबाजीच प्रत्यक्ष मदत मात्र शुन्य

अखेर पिडीत कुटूंबियांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक पाऊल

पिडीत कुटूंबियाला जाहिर मदतीचा धनादेश सुपूर्द

१० फेब्रुवारी, २०२० ही तारीख महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.

३ फेब्रुवारी, २०२० रोजी वर्धा येथे एका नराधमाने महाराष्ट्राच्या लेकीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते.

८ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरल्याने निर्भयाचा मृत्यू झाला होता.

ही घटना वर्धा निर्भया प्रकरण किंवा हिंगणघाट जळीत प्रकरण म्हणून ओळखले गेले.

याच घटनेमुळे शक्तीकायदयाचे सुतोवाच झाले होते.

संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणामुळे आक्रोश होता

संपूर्ण गाव आरोपीला शिक्षा होत नाही तोवर अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते.

तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमूख यांच्याकडून नुसतीच घोषणाबाजी

सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिडित अंकिता पिसुड्डेच्या परिवाराला आर्थिक मदत व तिच्या लहान भावाला सरकारी नोकरीत सामावून घ्यायचे लेखी आश्वासन दिले होते.

मात्र उध्दव ठाकरे आणि मविआ त्यांच्या सोयी आणि सवयीप्रमाणे दिलेला एकही शब्द पाळला नाही

२.५ वर्ष कसलीही काहीही मदत केली नाही

मात्र दिनांक २५ सप्टेबर, २०२३ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सदर निर्भयाच्या पिडित कुटुंबाला देवगिरी येथे बोलवून घेऊन आर्थिक मदतीचा धनादेश दिला. निर्भयाच्या भावाला सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली

निर्भया ही महाराष्ट्राची लेक होती ह्याची जाणीव संवेदनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून शब्द उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने दिलेला असला तरी तो पूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी केला.

म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचा आम्हाला अभिमान आहे असे चित्राताई वाघ म्हणाल्या

निर्भया सारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून सरकार आणि पोलीस प्रशासन कार्यरत आहे हा देखील विश्वास त्यांनी महाराष्ट्राला दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d