Saturday, January 25, 2025

कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची उपस्थिती

13 जुलै 2016 ला अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला फाशीची शिक्ष सुनावण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. त्यानंतर या आरोपींना अखेर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. दरम्याान महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली.

विवाहाचं निमंत्रण होतं, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान शनिवारी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची आकडेवारी सादर करत काही सवाल उपस्थित केले होते. काँग्रेसला 80 लाख मतं पडली तरी त्यांच्या सोळाच जागा आल्या आणि शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मत पडली त्यांच्या पेक्षा एक लाख कमी मात्र त्यांच्या 57 जागा आल्या असं शरद पवार यांनी म्हटलं होतं, यावर देखील यावेळी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Related Articles

2 COMMENTS

  1. होय होऊन जाऊद्या बॅलेट पेपरवर मतदान, कडक ठेवा बंदोबस्त, या बोगस मतदान करणाऱ्यांना चाप लावा, त्याच्या जीवावर या उड्या मारताहेत ,मतदान केंद्र बळकवण्याची प्रक्रिया यांनी अनेक वेळेस केलेली आहे ,आता ती होऊ देऊ नका, आणि पाहूया, गांडू पैलवान बोट मोडतो खानदानी पैलवान कुस्ती करतो या गांडूंना त्यांची जागा दाखवूया जय श्रीराम

  2. होय होऊन जाऊद्या बॅलेट पेपरवर मतदान, कडक ठेवा बंदोबस्त, या बोगस मतदान करणाऱ्यांना चाप लावा, त्याच्या जीवावर या उड्या मारताहेत ,मतदान केंद्र बळकवण्याची प्रक्रिया यांनी अनेक वेळेस केलेली आहे ,आता ती होऊ देऊ नका, आणि पाहूया, गांडू पैलवान बोट मोडतो खानदानी पैलवान कुस्ती करतो या गांडूंना त्यांची जागा दाखवूया जय श्रीराम

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles