Monday, March 4, 2024

तोतया सरपंच आणि ग्रामसेवकाची ग्रामपंचायतीत हेराफेरी, ६३ लाख हडप गून्हा दाखल

वैजापूर तालुक्यातील वीरगाव मुर्शदपूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या खात्यावरून बनावट सरपंच अन् ग्रामसेवकाने बनावट कागदपत्रे सादर उचलल्याप्रकरणी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विरगाव मुर्शदपूर ग्रामपंचायतीने महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र खाते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वैजापूर शाखेत खाते उघडले आहे. या व्यवहार करण्याचा खात्यावर अधिकार सरपंच व ग्रामसेवक यांना आहे. या ग्रामपंचायतीच्या 3 ऑगस्ट२०२३ पासून मनीषा राजेंद्र थोरात या सरपंच तर एस. व्ही. शेटे-निरपळ या ग्रामसेविका आहेत. २०२२-२०१३ या वर्षात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून गावात चार पाणंद रस्त्यांची कामे करण्यात आली. या कामांचे ग्रामपंचायतीच्या खात्यावर ३५ लाख रुपये जमा झाले. तसेच यापूर्वीचे २८ लाख असे एकूण ६३ लाख ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाले होने. सरपंच व ग्रामसेवकांनी बँकेतून १ नोव्हेंबर २०१३ ते २० जानेवारी २०१४ 1 या कालावधीचे स्टेटमेंट काढले. त्यावेळी त्यांच्या बँकेच्या खात्यावरून 1 वेगवेगळ्या तारखेला ६३ लाख ५७ 1 हजार २३६ रुपयांची रक्कम परस्पर काढून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास |आले. याबाबत त्यांनी चौकशी केली असता ग्रामपंचायतीचा सदस्य भरत कदम व त्याचा नातेवाईक महेश पवार (रा. नेवरगाव, ता. गंगापूर) यांनी ही
रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले.काही महिने भरत कदम हा उपसरपंच होता. या दोघांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा बनावट इतिवृत्त सान्दर करून बँकेला सही नमुने दिले. या इतिवृत्तात सरपंच म्हणून भरत शिवाजी कदम यांना दाखविण्यात आले. तर ग्रामसेवक म्हणून महेश तुकाराम पवार याला दाखविण्यात आले. भरत कदम नावाचा कुणीही व्यक्ती अद्यापपर्यंत वीरगावचा सरपंच झालेला नाही. तर महेश पवार नावाची व्यक्ती कधीही ग्रामसेवक नव्हती. विशेष म्हणजे हे सही नमुने बँकेला सादर करताना सरपंच व ग्रामसेवक यांना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्याचे कागदपत्र बँकेला पुरविण्यात आली.

बीडीओंचीही बनावट ग्रामसेवकास संमती
– महेश पवार नावाचा व्यक्ती ग्रामसेवक म्हणून पंचायत समितीमध्ये कार्यरत नसताना गटविकास अधिकाऱ्यांनी तो ग्रामसेवक असल्याचे कसे दाखवले, हा
प्रश्न निर्माण झाला आहे. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर तब्बल १६ दिवसांनी या प्रकरणी गुरुवारी रात्रीं फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ग्रामसेविका सोनाली शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भरत कदम व महेश पवार या दोघांवर विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles