अहमदनगर मधील प्रसिद्ध व्यवसायिक सुनील राऊत यांचे निधन
अहमदनगर मधील सिव्हिल इंजिनिअर सुनील रामराव राऊत यांचे हृदयविकाराने निधन
अहमदनगर : बुरुडगाव रोड येथील सिव्हिल इंजिनिअर सुनील रामराव राऊत यांचे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 46 वर्ष होते.
अहमदनगर महानगरपालिकेचे प्रथम महापौर भगवानराव फुलसुंदर यांचे भाचे होते
राऊत यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुनील राऊत हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होते गेल्या 24 तारखेला ते दार्जिलिंग येते मित्रांसमवेत ट्रीप साठी गेले होते परवा रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.