Thursday, May 9, 2024

फँड्री चित्रपटातील शालू-जब्याची जोडी.. रियल लाईफमध्ये जुळलं!

फँड्री चित्रपटातील शालू-जब्याची जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटाने चांगली कमाई केली होती आणि या चित्रपटासाठी त्यांचं खूप कौतुकही झालं होतं. या चित्रपटात जब्या व शालूची भूमिका करणारे सोमनाथ अवघाडे व राजेश्वरी खरात हे कलाकार मोठे झाले आहेत.

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडीओ रील्स शेअर करत असते. आता तिने जब्या म्हणजेच सोमनाथबरोबरचा एक फोटो शेअर करत ‘कशी काय मग जोडी’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच तिने शालू जब्या फॉरेव्हर असे हॅशटॅग दिले आहेत. तिच्या या फोटोवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles