मुंबई : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी 19 ऑगस्ट 2024 आणि या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालय निर्गमित करणार आहेत. शेतकरी दिनानिमित्त वेबिनार संवाद/मार्गदर्शन वर्ग आयोजित करुन दि.19 ऑगस्ट,2024 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे.