मिचाँग चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याचा अंदाज आहे. येत्या ४८ तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना मोठा तडाखा दिला आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याचा अंदाज आहे. येत्या ४८ तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
मिचाँग चक्रीवादळाने महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या विदर्भासह मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.