शेतकर्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातुनच कृषी निविष्ठा खरेदी करावीत – अध्यक्ष छबुराव हराळ यांचे आवाहन
नगर :- नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात मेशी परिसरात लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यावर तननाशकाची फवारणी केल्यामुळे शंभर एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील कांदा पीक नष्ट झाले असुन कोट्यावधी रुपयांचे नुकसानाची बातमी कळाली.
या बाबत बोलताना अहमदनगर जिल्हा खते, बियाणे, किटकनाशके संघटनेचे अध्यक्ष छबुराव हराळ म्हणाले की शेतकर्यांनी अनेक संकटाचा सामना करुन कांदा लागवड केली होती. मात्र कंपनीच्या सदौष औषधामुळे शेतकरी मात्र पूर्णतः उध्वस्त झाला असुन अस्मानी सोबत सुल्तानी संकटात सापडला आहे.
त्यामुळे शेतकर्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातुनच कृषी निविष्ठा खते, बियाणे, तननाशके, किटकनाशके खरेदी करावीत, सोबत पक्के बिल घ्यावे. इतर ठिकाणावरुन ऑनलाईन किंवा बांधावर येऊन विक्री करण्यार्या कंपनीची कुठलीही गॅरंटी नसते, त्यामुळे परवानाधारक अधिकृत विक्रेत्या शिवाय इतर ठिकाणावरुन कृषी निविष्ठा खरेदी करु नयेत, नुकसान होण्याची दाट शक्यता आसते असे आवाहन शेतकर्यांना केले आहे.






