Saturday, December 7, 2024

कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगासाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरू,कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरू
उद्या साफसफाई कर्मचारी काम बंद आंदोलन करून पाठिंबा देणार
राज्य सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास रात्री स्ट्रीट लाईट बंद ठेवणार
नगरकरांनी महापालिका कर्मचारी यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा – कर्मचाऱ्यांची मागणी
नगर : अहमदनगर मनपा कर्मचारी अधिकारी नगरकरांना जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देत असतात संकट काळामध्ये सर्वात आधी धावून येणारे कर्मचारी म्हणजे महापालिकेचे कर्मचारी होय.. तरीदेखील अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित आहे, राज्य सरकार या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनपा कर्मचाऱ्यांनी यावेळी केला, चौथ्या दिवशी साफसफाई कर्मचारी आपले सफाईचे काम उरकून उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते, यावेळी त्यांनी सांगितले की उद्या पहाटेपासून शहरातील स्वच्छता बंद ठेवणार असल्याचा इशारा यावेळी दिला, जर सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास शहरातील रात्रीचे पथदिवे देखील बंद ठेवले जाईल महापालिका कर्मचारी व नगरकर यांचे कामाच्या माध्यमातून ऋणानुबंध निर्माण झाले असून नगरकरांनी देखील कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी मनपा कर्मचाऱ्यांनी यावेळी केली.
अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरू असून यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, आर जी सातपुते, अस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, कामगार युनियनचे सचिव आनंद वायकर, अनंत लोखंडे आदिसह कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल बाबासाहेब राशिनकर आणि जितेंद्र सारसर उपोषणाला बसले असून चौथ्या दिवशी सांगितले की जर सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास अन्नत्यागाबरोबरच पाण्याचा देखील त्याग केला जाईल असे सांगितले मनपा कर्मचारी आपले काम बंद ठेवून मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी येत आहेत

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles