Sunday, December 8, 2024

अहमदनगर श्रीगोंदा रस्त्यावर भीषण अपघात ; तीन ठार; दोन गंभीर..

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाला नगर येथे तर दुसऱ्याला दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात विकास दादासाहेब वाळके ( वय २२) गणेश छगन उर्फ छबु वाळके (वय २८ ) पिंटू उर्फ लक्ष्मण नारायण भेसर (वय ४२, तिघे रा. पारगाव) हे या अपघातात मयत झाले आहेत. अक्षय गायकवाड आणि आणखी एक तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पारगाव गावातील महादेव मंदिराजवळ सरस्वती नदी पुलावर पारगाव येथील वरील तीन मयत इसम दुचाकी वर जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन हे पुलावरून खाली पडले. त्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे एक जण जागीच ठार झाला तर दोघांचा रात्री श्रीगोंदा मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यानंतर या अपघातात जागीच ठार झालेल्या मताची डेडबॉडी श्रीगोंदा ला घेऊन येत असताना श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर स्वामी विवेकानंद मेडिकल कॉलेज काही अंतर पुढे पारगाव च्या दिशेला डेडबॉडी घेऊन जाणारी रुग्णवाहिका आणि पारगाव च्या दिशेने जाणारी कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यात रुग्णवाहिकेचा चालक अक्षय गायकवाड आणि मयत व्यक्तीचा पुतण्या हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघात एवढा भीषण होता की या आवाजाने आजूबाजूचे नागरिक तिथे जमा झाले त्या लोकांनी मोठ्या मेहनतीने रुग्णवाहिकेचा दरवाजा तोडून या जखमी तरुणांना बाहेर काढत तत्काळ श्रीगोंद्यात उपचारासाठी पाठवले दुसऱ्या कारमधील व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून तो कारचालक श्रीगोंदा महसूल मधील तलाठी असल्याचे समजते. पोलिसांना घटनेबाबत माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अशा दोन अपघातात तीन तरुणांना आपला जीव गमावा लागला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. श्रीगोंदा तालुक्यात या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles