Saturday, March 2, 2024

नगर शहरातील उड्डाण पुलावर ट्रक- कारचा भीषण अपघात, एक ठार तीन जण जखमी

नगर शहरातील उड्डाण पुलावर स्टेट बँक चौकाजवळ कांदा गोण्या भरलेला ट्रक रस्त्यावर पलटी झाला. त्याच वेळी तेथून जाणारी कार या ट्रकखाली दबली गेली. या अपघातात ट्रक मधील क्लीनर जागीच ठार झाला तर दबलेल्या कारमधील तिघांना कार मधून सुखरूप बाहेर काढत वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. रविवारी (दि.४) पहाटे १.३० च्या सुमारास हा अपघात झाला.

नगरच्या नेप्ती कांदा मार्केट मध्ये शनिवारी (दि.३) कांद्याचे लिलाव होते. या लिलावात व्यापाऱ्याने खरेदी केलेला कांदा ट्रक मध्ये भरून ट्रक चालक व क्लीनर असे दोघे जण नगरहून छत्रपती संभाजी नगरकडे जाण्यासाठी मध्यरात्री निघाले हा ट्रक उड्डाणपुलावरून जात असताना स्टेट बँक चौकाजवळील वळणावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून रस्तादुभाजकाला धडकून ट्रक रस्त्यावर पलटी झाला. त्याच वेळी नगरकडून कायनेटिक चौकाकडे एक मारुती वॅगन आर कार जात होती. ती पलटी झालेल्या ट्रक खाली दबली गेली.

अपघातामुळे पुलावरील वाहतूक विस्कळीत होऊन तेथे गर्दी झाली. त्याच वेळी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निसार शेख, पोलीस हवालदार दिवटे पोलीस कॉन्स्टेबल काळे हे पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत स्टेट बँक चौकात आले. त्यांना उड्डाण पुलावर वाहनांची गर्दी दिसल्याने त्यांनी तातडीने पुलावर जावून पाहिले असता तेथे अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने हालचाली करत तेथील नागरिकांच्या मदतीने ट्रक खाली दबलेल्या कार मधील प्रवीण किसन काटे, साक्षी प्रवीण काटे व नवनाथ उदमले (रा. काळे वाडी, हिवरेझरे, ता.नगर) या तिघांना मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत कार मधून सुखरूप बाहेर काढले. ते जखमी असल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

त्यानंतर ट्रक खाली एकजण दबलेला असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला हटविला असता ट्रक खाली दबलेला इसम शुभम रघुनाथ शिंदे (वय ३५, रा. दावलवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) हा जागीच मयत झाल्याचे आढळून आले. मयत शिंदे हा ट्रकचा क्लीनर असल्याचे समोर आले. त्याचा मृतदेहही रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या पोलिस पथकाने क्रेनच्या सहाय्याने अपघात ग्रस्त वाहने बाजूला करत उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles