लहानपणीचा तो एक काळ आठवतो, ज्यावेळी एक चॉकलेट मिळाल्यानंतरही आपण आनंदाने उड्या मारायचो. पण, आता महागड्या वस्तू आणि सुखाच्या मोहापाई आपण आयुष्याचा खरा आनंद विसरतोय. पण, छोट्या छोट्या गोष्टींतूनही जगण्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर हा सुंदर व्हिडीओ एकदा पहाच. या व्हिडीओमध्ये एक वडील सेकंड हँड सायकल खरेदी करून घरी आणतात, जी पाहिल्यानंतर चिमुकल्याचा चेहरा अगदी आनंदाने फुलतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून युजर्सचेही डोळे पाणावले आहेत.
हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ही फक्त सेकंड हँड सायकल आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा, हे भाव असे आहेत की जणू काही नवीन मर्सिडीज बेंझ विकत घेतली आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज, हजारो लाईक्स आणि अनेक रिट्विट्स मिळाले आहेत. याशिवाय शेकडो युजर्सनी व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
It’s just a second-hand bicycle. Look at the joy on their faces. Their expression says, they have bought a New Mercedes Benz.❤️ pic.twitter.com/e6PUVjLLZW
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) May 21, 2022