मध्ये ३ ते ४ महिलांची सीटवरुन भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही घटना कर्नाटकातील असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक महिला बसच्या सीटवर बसणार होती, त्याचवेळी तिथे दुसरी महिला येते आणि तिला त्या सीटपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते, पण इतक्यात आणखी एक महिला मागून येते आणि पहिल्यांदा सीटजवळ गेलेल्या महिलेला जी ढकलण्याचा प्रयत्न करत असते तिचे केस ओढायला सुरुवात करते. यावेळी दोघींच्या बाजूने असणाऱ्या महिलादेखील एकमेकींचे केस ओढायला सुरुवात करतात. धक्कादायक बाब म्हणजे काही वेळाने त्या सर्व एकमेकींना मारहाण करत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. महिलांची भाडणं पाहून बसमधील लहान मुलं जोरजोरात रडत असल्याचा आवाजही येत आहे. शिवाय बसमध्ये खूप गर्दी आहे, मात्र महिलांची भाडणं सोडवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही.
Kalesh B/w Two Woman inside KRCTC over seat issue/Free bus ride in Karnataka pic.twitter.com/OL3rUmnA04
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 2, 2023