लग्न म्हटल्यावर सर्वांचे मानपान आलेच. अनेक घरांमध्ये लग्नात आत्या, मामा किंवा घरातील अन्य मोठे जावई रुसल्याचं ऐकायला मिळतं. मानपान न मिळाल्याने व्यक्ती लग्नात भांडणं देखील करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये लग्नाला आलेले पाहुणे लग्नातील जेवणावरून भांडत आहेत.
लग्नातील गोड पंचपक्वान असलेलं जेवण सगळ्यांनाच आवडतं. त्यासाठी घरात एक लग्नपत्रिका आली तरी अनेक जण आपल्या ओळखीच्या बऱ्याच व्यक्तींना लग्नाला घेऊन जातात आणि जेवणावर ताव मारतात. लग्नात पनीरची भाजी आता कॉमन झाली आहे. सर्वच लग्नांमध्ये जेवणात पनीरची भाजी असते. अशात व्हायरल व्हिडीओमध्ये लग्नाला आलेले पाहुणे पनीरच्या भाजीसाठी भांडत आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नासाठी जेवणाच्या मंडपात नवरा आणि नवरी दोन्हीकडील माणसं जमली आहेत. जेवताना आमच्या भाजीत पनीर नाही म्हणून या पाहुण्यांमध्ये आधी बाचाबाची होते. काही वेळातच त्यांच्यातल्या या भांडणांना हाणामारीचं स्वरुप मिळतं. वधू आणि वर दोन्ही बाजूच्या व्यक्ती एकमेकांना मारहाण करू लागतात.
Kalesh b/w groom side and bride side people's during marriage over no pieces of paneer inside matar paneer
pic.twitter.com/qY5sXRgQA4— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 20, 2023