सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा भांडार. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ लग्नाचे असतात. लग्नातील संगीत, सप्तपदी, डान्स, हळदीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नात नवरा नवरी एकमेकांना सोबत राहायचे वचन देतात. मोठ्या व्यक्तींचा आशिर्वाद घेऊन त्यांच्या नात्याची सुरुवात होते. मात्र, जर लग्नातच नवरा नवरीची भांडणे झाली तर. नवरा नवरीने लग्नाच्या मांडवातच एकमेकांना मारले तर त्यांचे लग्न कसं टिकेल. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत नवरा-नवरीची लग्नाच्या दिवशी भर मांडवात हाणामारी झाली आहे. भर मंडपात ते दोघेजण एकमेकांना मारताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओत सुरुवातील नवरा-नवरी एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसत आहे. त्यानंतर अचानक नवरी नवऱ्याच्या कानाखाली मारते. याचा नवऱ्याला प्रंचड राग येतो. त्यानंतर नवरादेखील नवरीच्या कानाखाली मारतो. यानंतर त्यांची भांडणे सुरु होतात. ते दोघेही एकमेकांना खूप मारतात. याचाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.