Thursday, September 19, 2024

लाचलुचपत विभागाचा गुन्हा दाखल, नगरमध्ये अखेर मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित

अखेर सावेडी मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते व तलाठी सागर भापकर यांना शासन सेवेतून निलंबित केल्याचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिल्याने उपोषण मागे..
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलेला असून देखील हे अधिकारी आहे त्या ठिकाणीच कामकाज करत असून ही भूमिका संशयस्पद असल्याने शिवप्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते व तत्काळ मंडळ अधिकारी देवकाते यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली होती व अन्यथा २७ ऑगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले होते. मात्र असे न झाल्याने शिवप्रहार संघटनेच्या वतीने उपोषणास बसले असता जिल्हाधिकारी यांनी पत्र दिले की, मंडळ अधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते व तलाठी सागर एकनाथ भापकर यांच्या विरुद्ध अहमदनगर तोफखाना पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रलंबित अधिनियम कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्या अनुषंगाने देवकाते व भापकर दि. २६ ऑगस्ट २०२४ अन्वये शासन सेवेतून निलंबित केले आहे असे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी उपोषण कर्त्यांना दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. व निलंबित केलेल्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली असून यावेळी उपोषण करते शिवप्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव समवेत शिवाजी लहारे, माणिक झिने, निवृत्ती झिने, संतोष घोलप, महादेव भोसले, शुभम भोंदे, आदिनाथ झिने, एकनाथ झिने आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles