Monday, September 16, 2024

साई मंदिरात जाण्या-येण्यासाठी 4 नंबर प्रवेशद्वार खुले, शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश

साई संस्थान मंदिर परिसराचे चारही गेट आत-बाहेर जाण्यासाठी भाविक व ग्रामस्थांना खुले करा या मागणीसाठी गेले काही दिवसांपासून ग्रामस्थांचा आंदोलनाच्या माध्यमातुन रेटा सुरू आहे.बधवारी या आंदोलनाला मोठे यश आले. साई संस्थानने दक्षिण बाजूचे चार क्रमांकाचे महाद्वार खुले केले आहे. मात्र महाद्वार क्रमांक तीन अद्यापही पुर्णपणे खुले झाले नसल्याने या मागण्यांचा पाठपुरावा सुरू राहिल अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

साईबाबा मंदिराचे चारही गेट खुले करणे, चारही गेट जवळ मोबाईल, चप्पल स्टँड, सशुल्क दर्शन पास व्यवस्था व लाडू काऊंटर असावे या मागण्यांसाठी शहर व्यापारी संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने साईसंस्थान प्रशासनास मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले होते. या मोर्चाद्वारे सदर मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात संस्थान प्रशासनास 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु या काळात महाद्वारे खुली करण्याबाबत कारवाई झाली नव्हती.

या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, किशोर गंगवाल, बाळासाहेब लुटे, निलेश कोते, संदीप पारख, सुधाकर शिंदे, दीपक वारुळे, नितीन कोते, गोगुळ ओस्तवाल, बाबासाहेब कोते, आप्पासाहेब कोते, रविंद्र गोंदकर, मनोज लोढा, विकास गोंदकर, नरेश पारख, कैलास आरणे, रविंद्र कोते, सचिन लुटे, निलेश गंगवाल आदी ग्रामस्थांच्या शिष्ठमंडळाने संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांची भेट घेऊन मागण्यांची कैफियत मांडली. मागण्या पूर्ण न केल्यास 21 ऑगस्टपासून महाद्वार 4 समोर उपोषणास बसण्याबाबत निवेदन दिले होते.

याबाबत सीईओ गाडीलकर सकारात्मक प्रतिसाद देत महाद्वार 4 पूर्णपणे उघडण्याबाबत आणि साईउद्यान या ठिकाणी साईभक्तांच्या सुविधेसाठी पेड पास युनिट देखील सुरु करण्याबाबत निर्देश दिले. यात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनीही ग्रामस्थांच्या मागणीचे जोरदार समर्थन केले. महाद्वार 3 खुले करण्यासंदर्भात संस्थानच्या तदर्थ समितीशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही गाडीलकर यांनी दिल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles