राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिेच्या रोड डिपार्टमेंटच्या तक्रारीनंतर एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय कामात अडथळा आणणे आणि जमाव जमवणे. या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाचे नेते तसेच पदाधिकारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री परेल येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती.पण याच डिलाई रोड ब्रिजच्या लेनच्या उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मुंबई महापालिकेने एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरा आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला.