Thursday, July 25, 2024

नव्या फौजदारी कायद्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल

अहमदनगर -देशभरात सोमवारपासून (1 जुलै) नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. या कायद्याअंतर्गत नगर जिल्ह्यातील पहिला गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी दाखल झाला. तालुक्यातील कामरगाव शिवारात सोमवारी पहाटे दोघा मित्रांना मारहाण करून कोयता व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तीन लाख 28 हजार रूपयांचा ऐवज लुटला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 309 (4), 3 (5), आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश मोहन शिंदे (वय 36 रा. कदमवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली असून तीन अज्ञात चोरट्यांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरात सोमवारपासून नवे फौजदारी कायदे लागू झाले आहे. ब्रिटीश काळात बनवलेल्या फौजदारी कायद्यांच्या जागी नवीन कायदे अस्तित्वात आले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा देशभरात लागू झाला आहे. दरम्यान, या कायद्यानुसार नगर जिल्ह्यातील पहिला गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. गणेश शिंदे व त्यांचा मित्र सोमवारी पहाटे नगर- पुणे रस्त्याने प्रवास करत असताना त्यांना कामरगाव शिवारात पहाटे साडेतीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles