Friday, July 11, 2025

पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी पहिला मोठा निर्णय

देशाचे नवे पंतप्रधान म्हणून आज नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिलाच मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. पंतप्रधान किसान निधीच्या १७ व्या हप्त्याला मंजुरी दिली. पंतप्रधानांनी आज पदभार स्वीकारताच निधी मंजुरीच्या फाइलवर पहिली सही केली. २० हजार कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून, याचा थेट फायदा ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. काल एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यालयात पदभार स्विकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याला मंजुरी देणाऱ्या फाईलवर सही केली. यामुळे 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे वाटप होईल.

किसान कल्याणसाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. आम्हाला पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles