Wednesday, February 28, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरात पहिलं म्युझिकल फाउंटन गार्डनचा लोकार्पण

नगर – पुणे, मुंबई शहरांच्या धर्तीवर आपल्या नगर शहराचा कायापालट झपाट्याने होत असून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर शहरासाठी मोठा निधी प्राप्त करून तो महानगरपालिकेला वर्ग केला जातो, त्या माध्यमातून महापौर, उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या माध्यमातून नगर शहरातील विविध प्रभागांमध्ये त्याचे समान वाटप करून शहरातील प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम होते, शहरातील प्रत्येक प्रभागात समान विकास साधण्यासाठी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी कायम मेहनत घेतली. आज नगर जिल्ह्यासाठी दोन म्युझिकल फाउंटन मंजूर झाले असून त्यातील एक बुरूडगाव रोड येथील साईनगर गार्डनमध्ये बसवण्यात आला असून दुसरा लवकरच सावेडी परिसरातील गंगा उद्यान येथे बसवण्यात येणार असल्याने शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे, म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून शहराच्या पर्यटनाला चालना मिळेल, गणेश भोसले हे नवनवीन संकल्प मांडणारे नेतृत्व आहे, बदलत्या नगरच्या दृष्टीने नगरकरांच्या हक्काचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच आरोग्य सेवेत दाखल होईल, नागरिकांनी एकत्र येण्यासाठी ज्याप्रमाणे लो. टिळक यांनी गणेशोत्सव सुरु केला त्याचप्रमाणे घरगुती गणपती विसर्जनासाठी नगर शहरात पहिल्यांदाच माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी हौदाची संकल्पना आणली, त्यानंतर संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात नागरिक एकत्र येत गणेश विसर्जनाचा उपक्रम साजरा करू लागले असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. नगर शहरातील बुरूडगाव रोड परिसरातील साईनगर येथे आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून व मा. उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नगर जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचे उद्घाटन शहराचे आमदार संग्राम जगताप व अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मीना चोपडा, संजय चोपडा, अविनाश घुले, विपुल शेतीच्या प्रा. माणिकराव विधाते, संजय शेंडगे, गणेश कवडे, सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, अजिंक्य बोरकर, समद खान, आरिफ शेख, भा कुरेशी, विजय गव्हाळे, गौरी बोरकर, संगीताताई भोसले, अरविंद शिंदे, संभाजी पवार, वैभव ढाकणे, दत्ता खैरे सागर गुंजाळ,संतोष ढाकणे, संतोष भोसले, नामदेव भोसले, निलेश मदने, सुनिल भोसले, विजय फुलसौंदर, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, गेल्या 30-35 वर्षांपासून राजकीय इच्छाशक्ती अभावी शहराचा विकास खुंटला होता. परंतु नगरकरांनी शहर विकासाचा मुद्दा हाती घेऊन आमदार संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही नगरकरांच्या विश्वासाला कधीही तडा न जाऊ देता अहोरात्र शहरी विकासाचा ध्यास घेऊन काम करत राहिले. जी कामे 30-35 वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होती ती आज आमदार जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून शहरी विकास साधला. आज नगर शहरातून इतर ठिकाणी स्थायिक झालेल्या नगरकर ही बदलत्या नगराने पुन्हा एकदा शहरात वास्तव्यास येण्यास उत्सुक आहेत. आमदार जगताप यांच्या माध्यमातून अनेकांनी नगर बदलतय अशी भावना व्यक्त केली. आपल्या प्रभागातही मोठी विकास कामे झाली असून प्रभागातील रहिवासींनी प्रभाग स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्यासाठी सहकार्य करावे. इथून मागे नगरकरांना कुटुंबासोबत मनोरंजनासाठी शहरात कुठेही चांगले उद्यान उपलब्ध नव्हते परंतु आमदारांनी शहरातील उद्यानांना पुनर्जीवित केले.असे ते म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles