आ. संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून गुडघे, खुबा, संधिवात तसेच हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी मोठी संधी
अहमदनगर : पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे तसेच आमदार संग्राम जगताप यांचे पुढाकारातून गुडघे व सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन अरुणोदय सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल येथे शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून करणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ सुप्रसिद्ध डॉ. नरेंद्र वैद्य हे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. ही सुविधा अहमदनगर येथे प्रथमच आमच्या रुग्णालयामार्फत उपलब्ध केली जात आहे. नगर शहर व परिसरातील ग्रामीण अस्थिरोग रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपचार व्हावेत या उद्देशाने ही सुविधा निर्माण केली जाणार आहे. या मध्ये सहभागी रुग्णांना शस्त्रक्रियेत खास सवलत दिली जाणार आहे. गरजु रुग्णांनी अरुणोदय रुग्णालय येथे आकाश शहाणे 8483848495 तसेच अजित घाग 83 55 83 8808 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन अरुणोदय हॉस्पिटलचे संचालक डाॅ. शशिकांत फाटके यांनी सांगितले. यावेळी अर्चना पतंगे उपस्थित होत्या.
डाॅ. श्रीकृष्ण जोशी म्हणाले की, डॉ.नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विविध गावात सुपर स्पेशालिटी ओपीडी आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी ,खुब्याचे तसेच मणक्यांचे विकार विषयी मार्गदर्शन करणे, अत्याधुनिक उपचाराची माहिती व तपासणी केली जात आहे. रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट,एक्सरे आणि अन्य काही रिपोर्ट आपल्या सोबत आणणे आवश्यक आहे. गुडघेदुखी ही समस्या आता ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित न राहता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसुन येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ,वाढत्या वजनामुळे गुडघ्यांच्या समस्यांनी अधिकच गुडघेदुखी होते. गुडघ्याची तपासणी जर सुरुवातीच्या अवस्थेत केली तर औषधे व्यायामांनी आराम होतो. पण जर गुडघ्यातील कुर्चेची झीज झाली असेल तर मात्र आजकाल दुर्बिणीद्वारे उपचार, पी आर पी इंजेक्शन याव्दारे करता येतात. गुडघे दुखीवरील 60% रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज नसते परंतु गुडघ्यातील दोन हाडांमधील कुर्चेची अंतिम टप्प्यातील झीज असेल ,पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. यात आता आमुलाग्र बदल होवुन रोबोटीकचा सहभाग यशस्वी ठरतो आहे. या तंत्रज्ञानामुळे सर्जनला रिअल टाईम डेटा मिळत असल्याने शस्त्रक्रियेचे नियोजन व त्याची अचुक अंमलबजावणी करणे शक्य झाले आहे.
कन्हेशन पध्दतीच्या तुलनेतील रोबोटीक प्रणालीमध्ये अत्यंत अचुकता येते. पुर्वापार पध्दतीत निष्णात व अनुभवी सर्जनने गुडघ्यावरील सांधेरोपण शस्त्रक्रिया करुनही जवळपास चार रुग्णापैकी एका रुग्णात मानवी त्रुटी ( गुडघ्याच्या अलाईनमेंट मध्ये 4 mm इतका आउटलायर )आढळत असल्याचे संशोधनात सिध्द झाले आहे .हे रोबोटच्या सहाय्याने टाळणे शक्य झाले आहे. त्यामुळेच गुडघ्याच्या संरचनेतील बोन ,लिगामेंट हे प्रिसर्व्ह केले जातात त्यामुळे नैसर्गिक रचनांचे जतन होते. रुग्णांच्यादृष्टीने जलद रिकव्हरी, सांध्यामध्ये नैसर्गिक सहज , सुलभ हालचाल, अचुकतेमुळे दुरगामी फायदे व कृत्रिम इम्प्लांटचे अधिक आयुर्मान वाढते. बहुतांश रुग्ण शस्त्रक्रियेनंतर लगेच दुस-या दिवशी चालु लागतात. तिस-या दिवशी जिने चढता येवु शकतात व घरीही जाता येते. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसात रुग्ण गाडी चालवणे, पोहणे, ट्रेकींग करणे, मांडी घालणे, दैनंदिन घरातील कामे यासर्व गोष्टी करता येतात असा स्वानुभव रुग्ण सांगतात.
शस्त्रक्रियेनंतर होणारे पल्मनरी इम्बोलिझमसारख्या धोके कमी होतात. शस्त्रक्रियेच्या सर्व नोंदीची उपलब्धतता त्यामुळे भविष्यकालीन अर्टिफिशल इंटिलीजन्स वापरुन भावी पिढीतील सर्जनना मार्गदर्शक प्रोटोकाल तयार करण्यास उपयुक्तता यंत्रणा भारतात आणुन रुग्णांना उपलब्ध करुन देणारे विख्यात तज्ञ डाॅ. नरेंद्र वैद्य स्वतः रुग्णांची तपासणी करणार आहेत.
डॉ.नरेंद्र वैद्य यांनी जगातील दहा देशात अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. 45,000 हून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया 12,000 रोबोटीक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि १,५०,००० हुन अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. रोबोटीक शस्त्रक्रियेचे अमेरिका, जर्मनी आणि स्वीडन येथे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोच्या सहाय्याने सांधेरोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर भारतात प्रथम आणुन त्यांनी 12,000 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.
डॉ.वैद्य यांनी पुणे विद्यापीठात शल्य शास्त्र विभागात सुवर्णपदक मिळवले आहे. 150 हुन अधिक त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये त्यांचे शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. देश विदेशात शंभरहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते मानद सदस्य असून अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची साखळी त्यांनी स्थापन केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावेत यासाठी ते कार्यरत आहेत.