Wednesday, April 30, 2025

आ.सग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश, बस स्थानकासाठी सुमारे सहा कोटी निधी मंजूर

नगर : अहमदनगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी राज्य व जिल्ह्याभरातून प्रवासी आपल्या कामासाठी एसटीच्या माध्यमातून बस स्थानकावर येत असतात याचबरोबर शाळकरी विद्यार्थी देखील शिक्षणासाठी शहरात दररोज येत आहे तारकपूर व पुणे बस स्थानकाची अक्षरशा दुर्दशा झाली असून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे याचबरोबर मोठमोठे खड्डे पडले असून प्रवाशांना या समस्येमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर शहराचे नाव खराब होत असते शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य सरकारकडे विकास कामासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे तारकपूर बस स्थानकातील अंतर्गत कॉंक्रिटीकरण कामासाठी पाठपुरावा केला असून या कामासाठी तीन कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे याचबरोबर स्वस्तिक चौक पुणे बस स्थानक अंतर्गत कॉंक्रिटीकरणासाठी २ कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की, परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे बस स्थानकाच्या विकास कामासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे बस स्थानकातील विकासाचे व सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे, यासाठी एमआयडीसी विभागातून सुमारे ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाकडे राज्य सरकारने कर्जरुपी निधी वर्ग केला आहे. त्यामुळे तारकपूर बस स्थानक व स्वस्तिक चौक येथील पुणे बस स्थानक अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार आहे, या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभले आहे, लवकरच हे काम सुरु होऊन प्रवाशांची गैरसोय दूर होईल, यापूर्वीही माळीवाडा मुख्य बस स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी 16 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles