Sunday, December 8, 2024

अहमदनगरमध्ये खळबळ….जेवणातून 200 जणांना विषबाधा अनेकांना रुग्णालयात दाखल

हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात बुधवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास घडली. जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.
विषबाधा झालेल्यांमध्ये ७ बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेनं अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा गावात बुधवारी नवरदेवाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता.
या कार्यक्रमात नवरदेवाच्या नातेवाईकांसह गावातील काही मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, जेवणानंतर रात्री अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. प्रकृती खालवत असल्याने 200 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
यापैकी 59 लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. विषबाधा झालेल्या व्यक्तींमध्ये ७ बालकांचा देखील समावेश आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी आमदार वैभवराव पिचड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णांना मदत करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. अति गंभीर रुग्णांना तातडीने नाशिक, संगमनेर येथे हलविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles