एक फूड ब्लॉगरचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्यक्ती जगातला पहिला फूड ब्लॉगर होता असं म्हणतात. विश्वास बसत नाहिये तर मग हा व्हिडीओ एकदा पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवणार नाही. हा व्हिडीओ आहे लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील ही व्हिडीओ क्लिप आहे. पण ही क्लिप एखाद्या फूड ब्लॉगरच्या व्हिडीओ प्रमाणे एडिट केलीये. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लक्षा मामांकडे खाण्यासाठी पैसे नाहियेत आणि त्यांना प्रचंड भूक लागलीये. त्यामुळे ते एका भजीवाल्याजळ जातात आणि त्याचं प्रचंड कौतुक करतात. म्हणे त्याच्या भज्यांना अमेरिकेत मागणी आहे. अर्थात हे कौतुक ऐकून दुकानदार खुश होतो आणि काही भज्या फुकटात खायला देतो. खरं तर हा व्हिडीओ फूड ब्लॉगर्सवर केलेलं एक गंमतीशीर मीम आहे.
- Advertisement -