Wednesday, April 24, 2024

माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले……तर आम्हालाही मते देऊ नका !

नगर – विकास कामातून भौगोलिक विकासाबरोबरच आर्थिक विकास साधला जातो, दळणवळणाची लिंक जोडली गेली की नागरी वसाहती वाढत जातात, त्यामुळेच नगर शहरासह उपनगरातील रस्ते दर्जेदार पद्धतीने बनवण्याचे काम सुरू आहे. बोल्हेगाव हे आता ग्रामीण भाग राहिला नसून एक मोठे उपनगर झाले आहे, शहरातील नागरिकांना निवडणुकीच्या काळात विकास कामांचे दिलेले वचन पूर्णत्वास जात आहे याचा मला आनंद आहे, विकास कामातून शहराला नावलौकिक मिळवून देत आहे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी बोल्हेगाव नागापूरच्या विकास कामांसाठी सतत पाठपुरावा केला असल्यामुळे खेडे गावचे रूपांतर शहरात झाले आहे, गेल्या १० वर्षात मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावली आहे, आपली पिढी सुसंस्कृत व्हावी व अध्यात्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याकरीता मंदिर परिसरात सभा मंडपाचे काम उभे केले आहे, लवकरच गांधीनगर व गणेश चौक येथील प्रलंबित रस्त्याची कामे मार्गी लागणार आहे, शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी आणलेल्या निधीचा वापर कुमारसिंह वाकळे हे योग्य पद्धतीने करत असल्याने बोल्हेगाव परिसरात विकासाची कामे उभी राहिली आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी गावठाण ते बोल्हेगाव ते निंबळक बायपास पर्यंतच्या सुमारे ८ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्यातून व आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सभापती कुमारसिंह वाकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, ह. भ. प तुकाराम महाराज कातोरे, राधाकिसन महाराज कातोरे, भिवसेन महाराज कोलते,अमोल लगड, सचिन जगताप, ज्ञानदेव कापडे, मारुती कापडे, विजय वाकळे,मछिंद्र वाकळे,दिलीप वाकळे,नाथा वाटमोडे,बाळू अण्णा वाकळे. रंगनाथ वाटमोडे, भीमा वाकळे, बबन कराळे. रुपचंद कळमकर, गुलाब शेख, रमेश वाकळे, किसनराव भिंगारदिवे, राम कदम, साधनाताई बोरुडे, रजनी आमोदकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, अनेक नागरिकांची बोल्हेगाव भागात रहिवासासाठी तसेच उद्योगधंद्यांसाठीची पसंती वाढत असल्याने येथील रस्त्यांची कामे प्रामुख्याने आपण हाती घेतले आहे. काही दिवसातच शहर व बोल्हेगाव भागाला जोडणाऱ्या सीना नदीवरील पूलाचे देखील काम सुरू होणार आहे काही वर्षांपूर्वी या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. परंतु माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून येथील भागांचा विकास साधला जात आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, काही काळापूर्वी या भागातील परिस्थिती बिकटच होती परंतु आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आपण येथील विकासाचा अनुशेष भरून काढत आहोत. सावेडी गावठाण ते बिरोबा मंदिर ते निंबळक बायपास पर्यंतच्या या महत्त्वाच्या रस्त्याचे कामाचे शुभारंभ आज होत असल्याने समाधान वाटते. आज एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या नोकरदारवर्गाला या रस्त्यामुळे निंबळक बायपासला लवकर पोहोचून आपल्या नियोजित ठिकाणी वेळेत व सुरक्षित पोहोचता येणे शक्य होणार आहे. दहा वर्ष या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना आ. संग्राम जगताप यांचा अनुभव कामी आला. प्रभागातील विकास कामे करत असताना जिथे कुठे आम्हाला अडचण आली तिथे आमदार संग्राम जगताप यांनी काम केले. प्रभागातील सुज्ञ नागरिक तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पाठबळामुळेच आम्ही प्रभागाचा विकास करू शकलो. प्रभागातील आठ चौकांचे सुशोभीकरणाचे कामे हाती घेतले असून लवकरच या सुशोभीकरणाच्या माध्यमातून ही प्रभागाचा कायापालट होण्यास मदत होईल. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहराने विकासाची भरारी घेतली आहे. मंदिर तिथे सभा मंडप संकल्प आमदार संग्राम जगताप यांनी हाती घेतला आहे. प्रभागातील अनेक रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ लवकरच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होऊन कामे पूर्णत्वास येतील. कोणावरही टीका टिप्पणी करण्यापेक्षा समाजातील जनतेच्या अडीअडचणी तसेच प्रभागाच्या विकासासाठी आपला वेळ घालविला पाहिजे असे आम्हाला आ. संग्राम जगताप हे नेहमी सांगत आले. आणि आम्ही देखील याच मार्गावर चालत असून बोलण्यापेक्षा प्रभागातील विकासाच्या कृतीतून आम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, कचरा, मैला व्यवस्थापनाचे कामे मार्गी लागत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा समस्या सुटण्यास मदत होत आहे. असे त्यांनी सांगितले
यावेळी सूत्रसंचालन इंजि पंकज वाकळे यांनी केले

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकासाची कामे करीत असून त्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार विकास कामांमधून जनतेचा विश्वास संपादन करत आहोत. त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही निवडणुकांमध्ये आपल्याकडे आशीर्वाद रुपी मते मागायला येतो. आम्ही नागरिकांना सांगू इच्छितो की, जर आम्ही विकासाची कामे केली नसेल तर आम्हाला मते देऊ नका.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles