Saturday, May 25, 2024

अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी निवडणूक लढणार

ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने आपण नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मतदारसंघात विकासाचा अजेंडा राबवणार असल्याची माहिती माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

खेडकर म्हणाले की, राज्यात मराठा-ओबीसी वाद अजूनही कमी झालेला नसून, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांना आजही मराठा समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

आमच्या पार्टीने राज्यात अठरा ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. या मतदारसंघात ओबीसींची संख्या लक्षणीय असतानाही दोन्हीही प्रमुख पक्षांनी मराठा समाजाच्या नेत्यांनाच उमेदवारी दिली आहे. माझी उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला असला, तरीही उर्वरित वेळेत आपण प्रचार पूर्ण करू.

वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात आपल्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, या विषयी सकारात्मक चर्चा चालू असून, वंचित निश्चित मला पाठिंबा देईल. प्रकाश शेंडगे, महादेव जाणकार या ओबीसी उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिला असून, नाशिकमध्ये जर भुजबळ यांना उमेदवारी मिळाली, तर तेथेही वंचित भुजबळांना पाठिंबा देऊ शकते.

ओबीसी समाजचे संरक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य असून, मतदारसंघात ठिकठिकाणी एमआयडीसी उभारून बेरोजगारीच्या हाताला काम देण्याचा आपला मानस आहे. या मतदारसंघात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने जलसंधारणाच्या विविध योजना आपण राबवणार आहोत.
जे सध्या आपले प्रमुख विरोधी उमेदवार आहेत, त्यांना आपण आपला प्रतिस्पर्धी मानत नसून, त्यांच्यासमोर बसून कधीही चर्चा करण्याची आपली तयारी आहे. दोन्हीही उमेदवार सध्या विकासाच्या मुद्यावर काहीच बोलत नसून, केवळ आरोप-प्रत्यारोप करत आहेत. निवडून आल्यावर आपण शेती, पाणी, बेरोजगारी, शिक्षण, वाढती व्यसनाधीनता या विषयांवर काम करणार आहोत, असेही खेडकर म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles