माजी महापौर संदीप कोतकर विधानसभा लढवणार ! आता मागे हटणार नाही…सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट
माझ्या प्रियनगरकरांनो,**नमस्कार…
गेली अनेक दिवसांपासून मी माझ्या व्ययक्तिक अडचणींमुळे आपल्याशी हितगूज करू शकलो नाही. परंतू आता वेळ आलीय बोलायची… म्हणून आपल्याशी हितगूज करतोय… नगर शहर विकसित व्हावं, शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं. महापौर पदाच्या काळात केडगाववासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, केडगाव पाणी पुरवठा योजना, शहर पाणी योजना, शहरातील रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आले. याचे साक्षीदार तुम्ही आहातच. अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहे. तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांची सुरक्षितता, शिक्षणासाठी सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, उच्च शिक्षण, एमआयडीसी उद्योगधंदे यावर काम करणं मला आवश्यक वाटतं. नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खूणगाठ बांधलीय. पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीस मागे पडलंय. आपल्याशी हितगूज करतांना मनाला खूप वेदना होतायेत. पण आपल्या नगर शहराला पुणे, नाशिकच्या बरोबरीने का होईना न्यायचेय. ही मनोमन इच्छा आहेच.
महापौर पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मोलाची साथ दिली. तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापीही शक्य नाही. नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे. त्यात थोडासाही बदल झालेला नाही. आणि होणारही नाही. गणपती विसर्जनाच्या वेळी माझ्या एका आवाहनावर तूम्ही हजारोंच्या संख्येने स्पंदन प्रतिष्ठानच्या आयोजित गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. आणि गणपती बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झालात. हीच *गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे.* माझ्यावर आपले असलेले अतूट प्रेम या मिरवणुकीतून दिसून आले. अन ह्दय भरुन आले. नगरकरांनो आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास हा कदापीही तूटू देणार नाही हा माझा तूम्हाला शब्द आहे.
कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच काहीसा प्रयत्न माझ्या बाबतीतही केला जातोय… *पण आता मी थांबणार नाही… मागे हटणार नाही….* नगरकरांना दिलेला शब्द…. शहर विकासाचं पाहिलेलं स्वप्न… पूर्ण करण्यासाठी मागे हटणार नाही…
*शहराच्या विकासावर आपण नंतर बोलूच….!*
*सत्य परेशान हो सकता है*
* लेकिन पराजित नही…*
*लवकरच भेटूयात…*🙏
आपला
*संदीप कोतकर*
*माजी महापौर
माजी महापौर संदीप कोतकर विधानसभा लढवणार ! आता मागे हटणार नाही…
- Advertisement -